नागपूर शहर: माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी महाल येथील मस्कऱ्या गणपतीचे घेतले दर्शन
15 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता च्या सुमारास माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी महाल येथील मुधोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक पारंपारिक मस्कऱ्या गणपतीचे दर्शन घेतले. संवादही साधला आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यादरम्यान मुधोजीराजे भोसले यांनी आशिष शेलार यांचा सन्मान देखील केला.