दिग्रस नगर परिषदेच्या निवडणूक निकालानंतर येत्या १२ जानेवारी रोजी उपाध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. या निवडीमुळे नगर परिषदेतील पुढील राजकीय समीकरणे निश्चित होणार असल्याने या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, दिग्रस येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि. ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता एकूण तीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.