वाशिम: जिल्ह्यातील शिरपूर येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
Washim, Washim | Sep 16, 2025 शिरपूर येथे काल नाल्यात आलेल्या पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. अखेर आज सकाळी या तरुणाचा मृतदेह सापडला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.रवी राऊत (वय 32) असे मृत तरुणाचे नाव असून तो शिरपूर येथील शेलगाव बगाडे येथील रहिवासी आहे. काल नाल्यात अचानक आलेल्या पुरात तो वाहून गेला होता. घटनेनंतर शोधमोहीम राबवण्यात आली. आज सकाळी घटनास्थळापासून जवळपास ५० फुटांवर त्याचा मृतदेह मिळून आला.