भंडारा: अडेगाव येथील 49 वर्षीय महिलेला सर्पदंश; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्याच्या अडेगाव येथील शिला बाबूराव पिंगळे (वय 49) यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. दि. 14 सप्टेंबर रोजी त्यांना एका विषारी सापाने दंश केला. त्यांना तात्काळ कोदामेढी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे रेफर केले. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आकस्मिक विभागात त्यांना दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.