नजिकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम बाबत निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी आतापासूनच कामाला लागावे, आपापसात समन्वय राखून सर्वांनी एकदिलाने काम करावे, अशा सूचना आज बुधवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जावळे यांनी पोलीस यंत्रणांसह विविध शासकीय यंत्रणांची दूरदृश्यप्रणालीद्वारे पूर्वतयारी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ.रविंद्र शेळके, जिल्ह्यातील व नवी मुंबई परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक, प्रांताधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.