जिल्हा वार्षिक योजनेतून विभागांना विविध विकास कामांसाठी निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्यासाठी काहीच महिने शिल्लक आहे. त्यामुळे विभागांनी आपल्यास्तरावर मंजूर कामे व निधीचा आढावा घेऊन मार्च अखेरपर्यंत सर्व निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.