शेगाव: त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावरील हल्ल्याच्या शेगाव शहरातील पत्रकारांकडून तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला
नाशिक त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा शहरातील शेगाव तालुका पत्रकार संघ व डिजीटल मिडीया संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचा निषेध आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता नोंदविण्यात आला. तसेच पत्रकार हल्ला विरोधी कायदा अधिक मजबूत करण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. तहसीलदार दीपक बाजड यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.