सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 'अरुणोदय' संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात 'सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान' राबविण्यात येत असून, याद्वारे दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांची मोफत तपासणी, समुपदेशन आणि उपचार केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी या अभियानाची माहिती देताना सर्व यंत्रणांना प्रभावी अंमलबजावणीचे आवाहन केले असून, सर्वांच्या सहभागातून एक निरोगी आणि सिकलसेलमुक्त समाज घडवण्याचा निर्धार 15 जानेवारी रोजी सायं. 7 वा. व्यक्त केला आहे.