नागपूर ग्रामीण: आर.टी.ई. विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली; 'आदर्श संस्कार विद्यालया'त पालकांचा संताप
वाठोडा येथील आदर्श संस्कार विद्यालयाने आर.टी.ई. (RTE) अंतर्गत मोफत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वसुली सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या अन्यायाविरोधात पालकांनी पत्रकार परिषद घेऊन शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला.