बारामती तालुक्यातील शेळ्या आणि बोकड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 12 लाख 95 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून यामध्ये 32 शेळ्या आणि बोकडांचा समावेश आहे.पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील अशोक बाबुराव जाधव याला अटक केली असून त्याचे दोन साथीदार सध्या फरार आहेत.