नागपूर ग्रामीण: गुमथी आणि ब्राह्मणवाड्यात चोरट्यांचा थरार; दोन घरांत धाडसी चोऱ्या
लूकेश भडंग यांनी दिलेल्या माहितीनुसार बैलवाडाच्या आजूबाजूला असलेल्या गुमथी आणि ब्राह्मणवाडा या दोन गावांत मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. अवघ्या काही तासांच्या अंतराने झालेल्या या दोन धाडसी चोऱ्यांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.चोरट्यांनी सर्वप्रथम गुमथी येथील विजयजी भोयर यांच्या घरी हात साफ केला.