गडचिरोली: 'त्या' दोन मृत महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणण्यात आले
आज, दिनांक १७/०९/२०२५ रोजी गडचिरोली पोलिसांनी एटापल्ली तालुक्यातील पोस्टे गट्टा जांबिया अंतर्गत येणाऱ्या मौजा मोडस्के जंगल परिसरात केलेल्या माओवादीविरोधी कारवाईत दोन महिला माओवादी ठार झाल्या आहेत. आज पाचच्या सुमारास सदर दोन्ही मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणण्यात आले.