जालना: शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी कारवाईसाठी महिलेचे तीन तास रस्त्यावर ठिय्या आंदोलन; पोलिसांनी अखेर घेतली तक्रार..
Jalna, Jalna | Jul 7, 2026 शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी कारवाईसाठी महिलेचे तीन तास रस्त्यावर ठिय्या आंदोलन; पोलिसांनी अखेर घेतली तक्रार.. आज दिनांक 7 मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील मंठा शहरात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल करून घेण्यात पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत एका महिलेने मुख्य रस्त्यावर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. या घटनेमुळे शहरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आंदोलन करणाऱ्या