पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीत त्रुटी कायम असून पुरवणी यादी तयार करून त्यामध्ये अपात्र अपूर्ण अर्ज केलेल्या नागरिक मतदारांची घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपचे माजी शहर अध्यक्ष अशोक अंभुरे यांनी केला आहे. शिवसेना शिंदे गट नगरविकास विभागाच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदार यादी प्रसिद्ध करायचे अर्ज व आवश्यक पुरावे यांचे पडताळणी करून निर्णय घ्यावा अशी करण्यात आली आहे.