नगर परिषद दिग्रस येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज दि. १२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्षा पंचशीला इंगोले यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगरसेवक तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.