धर्माबाद: बाभळी बंधाऱ्याचे गेट टाकण्यास शेतकऱ्यांनी दर्शवला विरोध, बुडीत क्षेत्राचा मावेजा दया मगच गेट टाका: मागणी
आज दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंत उमरी धर्माबाद नायगाव येथील शेतकरी हे बाभळी बंधाऱ्याचे गेट टाकण्यास विरोध दर्शवले असून जो पर्यंत बुडीत क्षेत्राचा मावेजा देण्यात येत नाही तो पर्यंत गेट बंद करण्यात येऊ नये असा हट्टहास करत शेतकरी एकत्र येत गेट बंद करण्यास विरोध केले होते, मावेजा दया मगच गेट टाका अशी मागणी करण्यात आली होती, त्यामुळे आलेल्या त्री स्तरीय समिती देखिल शेतकऱ्यांसमोर यायला धजावत नव्हती, यावेळी ह्या समितीच्या गाड्या देखील शेतकऱ्यांनी अडवल्या होत्.