तिरोडा: तिरोडा येथे राज्यस्तरीय कवी संमेलन उत्साहात संपन्न
Tirora, Gondia | Oct 6, 2025 तिरोडा येथे वृक्षवेल राज्यस्तरीय साहित्य मंच महाराष्ट्र भारत या समूहाचे राज्यस्तरीय पहिले कवी संम्मेलन उत्साहात संपन्न झाले. राज्यस्तरीय कवी संमेलनात कर्तबगार कवी साहित्यिक पदाधिकारी व अधिकारी यांनी उत्कृष्ट कार्यकरिता प्रेरणा मिळावी म्हणून यांना वृक्षवेल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कवी संमेलनात महाराष्ट्र राज्यातील ७९ कवी लेखकांनी सादरीकरण करत सहभाग घेतला आहे.