पनवेल क्षेत्रातील खारघर, कामोठे, नवीन पनवेल व तळोजा येथील नागरिकांना भेडसावत असलेल्या तीव्र पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. या भागात वारंवार होत असलेल्या अपुऱ्या व अनियमित पाणीपुरवठ्याबाबत सिडको प्रशासनाचे लक्ष वेधत पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम व सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या लक्षवेधीवर शासनाच्या वतीने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर देत सिडकोमार्फत पाणीपुरवठा वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना व प्रकल्पांची माहिती सभागृहात दिली.