पातुर: पातूरच्या माळ राजुरा येथील बारा फूट दुर्मिळ होत चाललेल्या अजगर सापाला जीवदान…!
Patur, Akola | Sep 24, 2025 पातूर तालुक्यातील माळराजुरा येथे तब्बल १२ फूट लांबीचा आणि ३५ ते ४० किलो वजनाचा अजगर आढळून आला. साप दिसताच भीतीने तसेच कुतूहलाने ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले. नागरिकांनी वनविभागाचे अविनाश घुगे यांना माहिती दिली. तोपर्यंत गावातील युवक कृष्णा हिवाळे, पवन चव्हाण, रोशन खंडारे आणि करण राठोड यांनी धाडसाने अजगराला थांबवून ठेवले. काही वेळातच सर्पमित्र स्वप्निल सुरवाडे, संजय बंड व प्रमोद कढोणे यांनी जीवदान दिले.