जालना: वीर सावरकर जलतरण तलावची दुरावस्था;*
*दालनांसाठी आगपाखड करणारे गप्प का?*प्रशासकीय अनास्थेविरोधात हिन्दू महासभा रस्त्यावर
Jalna, Jalna | Apr 8, 2026 आज दिनाक 8 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार : शहरातील आरोग्याचा कणा मानला जाणारा आणि कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला वीर सावरकर जलतरण तलाव गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत धूळ खात पडला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेतील दालनांच्या नूतनीकरणासाठी आणि श्रेयासाठी 'आगपाखड' करणारे लोकप्रतिनिधी या महत्त्वाच्या विषयावर मूग गिळून गप्प असल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रशासकीय अनास्थेविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा हिन्दू महासभा देवगिरी प्रांत प्रमुख तथा