जालना: जालना जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटवर तातडीने उपाययोजना कराव्यात; रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे निर्देश
Jalna, Jalna | Jun 26, 2026 जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अपघातप्रवण ठिकाणांवर (ब्लॅक स्पॉट) विशेष लक्ष केंद्रित केले असून, या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. शुक्रवार दि. 26 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली.