नागपूर महानगरपालिकेच्या १५ जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आता प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे. आज रविवारची सुटी साधत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा 'सुपर संडे' साजरा केला. शहराच्या सर्वच प्रभागांमध्ये आज भव्य रॅली, पदयात्रा आणि कोपरा सभांचा धडाका पाहायला मिळाला.सकाळपासूनच विविध प्रभागांतील उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन केले.