अमळनेर बसस्थानक परिसरात एका वृध्द प्रवाशाला बोलण्यात गुंतवून, 'शनी' असल्याचे सांगून हातचलाखीने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी चोरून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. या फसवणुकीत वृध्दाचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत. याबाबत रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.