खटाव: अंबवडे - गोरेगाव पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतमजुराचा मृतदेह शोधण्यासाठी रेसेक्यू टीमला पाचारण
Khatav, Satara | Sep 28, 2025 अंबवडे, ता. खटाव येथील शेतमजूर सुरेश रघुनाथ गायकवाड वय ४८ हे अंबवडे - गोरेगाव येरळा नदीच्या पुलावरून येत असताना वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. वाहून गेलेल्या सुरेश गायकवाड यांचा मृतदेह शोधण्यासाठी रेसेक्यू टीमला पाचारण करण्यात आले असून युद्ध पातळीवर शोधमोहीम सुरू आहे. पोलीस दल देखील ड्रोनच्या साह्याने शोध घेत आहे, अशी माहिती वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी रविवारी सायंकाळी साडेसात वाजता दिली.