जालना: कारखान्यातून समृद्धी महामार्ग जाणार नाही; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट ग्वाही दिल्याची नारायण वाढेकर यांची माहिती
Jalna, Jalna | May 2, 2026 जालना सहकारी साखर कारखान्यातून प्रस्तावित जालना-नांदेड समृद्धी महामार्ग कुठल्याही परिस्थितीत जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याची माहिती जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे नारायण वाढेकर यांनी शनिवार दि. 2 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता दिली. जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाशी झालेल्या बैठकीत त्यांनी ही ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगीतले.शनिवार दि. 2 मे रोजी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भेट घेतली.