कळमनूरी: अमरावती येथे चालू असलेल्या रोजगार सहाय्यक संघटनेच्या आमरण उपोषणास हिंगोली जि. व कळमनुरी ता.रोजगार सहायकांचा पाठिंबा
ग्राम रोजगार सहाय्यकाच्या संदर्भात दि .3 ऑक्टोबर 2024 रोजी जो शासन निर्णय करण्यात आला आहे,त्याची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यासाठी अमरावती ते गेल्या आठ दिवसापासून रोजगार सेवक श्रावण बोकडे हे आमरण उपोषणास बसले आहेत त्या उपोषणास हिंगोली जिल्हा व कळमनुरी तालुका ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने आज दि .12 ऑक्टोबर रोजी पाठिंबा देऊन श्रावण बोकडे यांना पूर्णपणे समर्थन दिले असल्याची माहिती ग्राम रोजगार सहाय्यक संतोष जाधव यांनी दिली आहे .