तुमसर तालुक्यातील सोरणा-लंजेरा या गावाने सरपंच धर्मपाल धुर्वे यांच्या दूरदृष्टीतून आणि लोकसहभागाच्या जोरावर विकास, स्वच्छता आणि जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी करत देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, या यशाची पावती म्हणून धर्मपाल धुर्वे यांना २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून 'विशेष अतिथी' म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.