नागपूर ग्रामीण: लोकमान्य नगरमध्ये रस्त्यावर तेल सांडल्याने अपघातांची मालिका; २५ हून अधिक दुचाकीस्वार घसरले!
लोकमान्य नगर परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर तेल सांडल्याने एकामागून एक अनेक गाड्या घसरून भीषण अपघातांची मालिका सुरू आहे. रस्त्यावरील तेलकटपणामुळे दुचाकीस्वारांचे वाहनावरील नियंत्रण सुटत असून, आतापर्यंत २५ हून अधिक लोक येथे घसरून पडल्याची माहिती समोर आली आहे.