बाळापूर विधानसभा क्षेत्रात ठाकरे गटाची जोरदार तयारी; आमदार नितीन देशमुख यांच्याकडून १५ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ पातुर-बाळापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नितीन देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून हाता गावात १५ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात आमदार देशमुख यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्वरित सोडवण्याचे आश्वासन दिले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) बाळापूर परिसरात संघटन मजबूत करण्यास