जालना: सिड्स कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगत शेतकर्याच्या बियाण्यांची जबरी चोरी;2 आरोपी जेरबंद,21 लाख 38 हजाराचा मुद्देमाल जप्त
Jalna, Jalna | Apr 19, 2026 नामांकित सिड्स कंपनीचा प्रोडक्शन मॅनेजर असल्याचे भासवून कर्नाटकातील शेतकर्याला जाळ्यात ओढत त्याच्या झेंडू फुलांच्या बियाण्यांची जबरी चोरी करणार्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत जेरबंद केले. रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत 21 लाख 38 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी लोकेश देवेंद्रप्पा इलेगर रा. बिर्नओप्पा, ता. ब्याडगी, जि. हावेरी, कर्नाटक यांना 18 एप्रिल रोजी जालना येथे लुटले होते.