नायगाव-खैरगाव: पंचायत समिती नायगाव येथील घरकुल लाभार्थ्याकडून पैसे घेणाऱ्या अभियंता व कर्मचारी यांना प्रशासनाने केले कार्यमुक्त
दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 ते 10 च्या दरम्यान आ. राजेश पवार यांनी अचानक तहसील व पंचायत समिती कार्यालय नायगाव येथे भेट दिली असता घरकुल लाभार्थ्याकडून ग्रामीण गृहनिर्माण अभियंता डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर अधिकारी यांनी घरकुल लाभार्थ्यांचे देयके काढण्यासाठी पैसे घेतले असल्याची कबुली दिली होती, तसा व्हीडिओ देखील व्हायरल झाला होता, जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केल्याचे पत्र देखील आजरोजी सकाळी 9 च्या सुमारास समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.