जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात साराबाई गणेश भोई वय ४६ रा. पाडळसा ता. यावल या महिला प्रवाशाचा दुर्दैवी अंत झाला होता. याप्रकरणी बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता बसचालकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.