चोपडा: चोपडा तालुक्यातील सनफुले या गावातून २३ वर्षीय तरुण झाला बेपत्ता, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार
Chopda, Jalgaon | Oct 22, 2025 चोपडा तालुक्यात सनफुले हे गाव आहे. या गावातील रहिवाशी मनोज हिरामण पाटील वय २३ हा तरुण आपल्या घरी सांगून गेला की मी गावातील सिंधुबाई हुकुमचंद पाटील यांच्या शेतात कामाला जात आहे. तेव्हापासून घरून निघालेला तरुण नंतर घरी परत आलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवण्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.