नागपूर शहर: दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : महेश सागडे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट दोन
गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी 29 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. पुढील कारवाईसाठी आरोपींना बजाज नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिली आहे.