कामठी नगरपालिका उपाध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. यात भाजपसमर्थित नगर विकास आघाडीच्या सबापरवीन तौसीफ खान यांनी काँग्रेसच्या आहफज अहमद वल्द अब्दुल शकूर यांना साह मतांनी पराभूत केले. सबापरवीन तौसीफ खान यांना २० तर अहफज अहमद वल्द अब्दुल शकूर यांना १४ मते मिळाली. तर एआईएमआईएम च्या नगरसेवक रुबिना शेख तटस्थ राहिल्या ,याच सभेत स्वीकृत सदस्यांचीही निवड करण्यात आली