वर्धा: जिल्ह्यात 17 सप्टेंबर रोजी 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान:पालकमंत्र्यांच्याहस्ते अभियानाचा शुभारंभ
Wardha, Wardha | Sep 15, 2025 ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. दि.17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांच्याहस्ते 17 सप्टेंबर रोजी सालोड येथे होणार आहे. अभियानात ग्रामपंचायती व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.