चंद्रपूर: महाकाली मंदीर परिसरात वृध्द महिलेचा विनयभंग करणारे आरोपीस पाच वर्ष कारावासाची शिक्षा
महाकाली मंदीर परिसरात एका ६५ वर्षीय वयोवृध्द महिलेचा विनयभंग करणारा आरोपी अयुब खान साहेब खान पठाण रा. गडचिरोली याचे विरुध्द पोलीस स्टेशन शहर येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.गुन्हयाचा तपास पोउपनि तृप्ती खंडाईत, पो.स्टे. चंद्रपूर शहर यांनी करुन आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले असता आज दि १५ सप्टेंबरला ३ वा.सदर गुन्हयात विद्यमान न्यायाधिश अभिश्री देव, अतिरिक्त जिल्हा व सत्र सत्र न्यायाधिश-१ चंद्रपूर यांनी आरोपीला ५ वर्षाची सक्त मजुरी आणि ५०००/-रु. दंडाची शिक्षा दिली.