शिर्डी येथील श्री साईंच्या मूळ पादुकांचे आज वर्ध्यात आगमन झाले.दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास वंजारी चौकातून साई मंदिरापर्यंत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. साई भक्तांच्या जयघोषात पादुकांचे स्वागत करण्यात आले.या पवित्र पादुका चौथ्यांदा वर्ध्यातील साई मंदिरात आगमन झाल्या असून सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शनासाठी उपलब्ध ठेवण्यात आले.