अचलपूर: समरसपुरा परिसरात जप्त घराचे सील तोडून अनधिकृत ताबा; तिघांविरुद्ध गुन्हा नोंद
शहरातील समरसपुरा परिसरात जप्त घराचे सरकारी सील तोडून बेकायदेशीरपणे राहायला गेल्याप्रकरणी तिघांविरुद्ध समरसपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना ५ जून रोजी सकाळी ९.४७ वाजता घडली असून फिर्यादीने २३ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली. फिर्यादी अब्दुल नदीम अब्दुल नसीर (वय ४०, रा. रुद्रकार कॉम्प्लेक्स, अमरावती) हे कंपनीच्या जप्त स्थावर गहाण मालमत्तेची पाहणीसाठी गेले असता, आरोपींनी सरकारी सील असलेले लॉक तोडून घरात प्रवेश केल्याचे दिसून आले. कंपनीची पूर्वपरवानगी न घेता, कोणतीही