मुसळधार पावसामुळे शहरातील धांडे नगर भागात नागरिकांची घरे आणि दुकानात घुसते पाणी
Beed, Beed | Sep 27, 2025 बीड शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धांडे नगर परिसरातील नागरिकांचे हाल झाले आहेत. सततच्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी घुसले आहे. परिणामी रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. धांडे नगर भागातील मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.