दिग्रस: दिग्रसच्या हरसूल येथील पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत पतीस जामीन, दारव्हा सत्र न्यायालयाचा आदेश
दिग्रस तालुक्यातील हरसूल येथील सपना महादेव नेमाडे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृतकचे नातेवाईक उमेश सोनुने यांनी दि. १७ जुलै २०२५ रोजी दिग्रस पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीत मृतकच्या पती महादेव लक्ष्मण नेमाडे व भावजई वंदना नेमाडे यांच्याकडून सतत पैसे मागणी व मानसिक छळ होत असल्यामुळे आत्महत्या झाल्याचे नमूद केले होते. पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आज दि. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जामीन मंजूर झाला.