अकोला : पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने रब्बी हंगाम 2025 साठी अकोला जिल्ह्यास ₹३२३ कोटी ४९ लाख ६८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महसूल विभागाच्या ४ नोव्हेंबरच्या निर्णयानुसार ही मदत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBT मार्फत जमा होईल. प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टर ₹१०,००० इतकी मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून ही माहिती ६ नोव्हेंबर रोजी सायं. ७ वाजता जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.