नगरपरिषद 2025 आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली, उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांची उपस्थिती
बीड शहरातील २६ प्रभागांमधील ५२ नगरसेवक पदाचे आरक्षण सोडत न.प. सभागृहात जाहीर करण्यात आले. यावेळी उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव, मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्यासह शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आता भावी अंग झटकून कामाला लागले आहेत.