पाचोरा: बहुळा धरणाचे नऊ दरवाजे उघडले पाण्याची मोठी आवक, 60,000 क्युसेक पाणी सोडले सतर्कतेचा इशारा,
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या सातगाव डोंगरी परिसरात झालेल्या मुसळधार पाऊस सलग सुरूच असून या परिसरातील वडगाव (कडे) , शिंदाड, वाणेगाव, निंभोरी, राजुरी, वाडी शेवाळे, सार्वे, पिंप्री या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या गावातील नदीसह परिसरातील नदी नाल्यांना पूर आल्याने हे सर्व पाणी बहुदा धरणाला येऊन मिळाले आहे, यामुळे बहुरा धरणाने समुद्र सारखे रौद्ररूप धारण केले आहे, भोंगळा धरण हे शंभर टक्के भरून ओव्हर फ्लो झाले असून या धरणाचे संपूर्ण नऊच्या नऊ दरवाजे सात फुटांपर्यंत उघडले,