पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक नौशाद शेख मित्र परिवाराच्या वतीने मोफत शासकीय सेवा कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प दिनांक १ जानेवारी ते ६ जानेवारी दरम्यान महादेवपुरा, रत्नीबाई शाळेजवळ सुरू आहे. या कॅम्पमध्ये नागरिकांसाठी ई-श्रम कार्ड अपडेट, आयुष्यमान कार्ड, ई-पॅन कार्ड, हेल्थ कार्ड, ई-लाडकी बहीण केवायसी तसेच झिरो बॅलन्स बँक खाते तयार करून देण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून