उत्तर सोलापूर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणार: दक्षिण सोलापूर गटविकास अधिकारी शंकर कवितके यांची माहिती...
मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" राबविण्यात येणार आहे. याबाबत पंचायत समिती दक्षिण सोलापुरचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी सोमवारी दुपारी ४ वाजता पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली. त्यांनी या अभियानाद्वारे स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींना सशक्त बनवून विकासकामांचे गतीशील नियोजन व अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.