पाचोरा आणि भडगाव नगरपरिषदेत शिवसेनेची संघटनात्मक बळकटी अधिक भक्कम होत असून आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाचोरा नगरपरिषद नगरसेवक सुमितदादा पाटील व भडगाव नगरपरिषद लखीचंद भाऊ पाटील यांची शिवसेना गटनेते म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली, ही संघटनेवरील जनतेचा विश्वास आणि सहकाऱ्यांचा सन्मान यांची ठाम पावती ठरली, ही निवड आमदार किशोरआप्पा पाटील, जिल्हाप्रमुख श्री. रावसाहेब पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली झाली.