कोरेगाव: मध्य रेल्वे प्रशासनाच्या पुढाकारामुळे कराड उत्तर शेतकरी संघटनेचे सोमवारचे आंदोलन स्थगित
कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील प्रमुख केंद्र असलेल्या तारगाव येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या दुरुस्तीबाबत अनास्था दाखविणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ कराड उत्तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसीम इनामदार यांनी शेतकरी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसह सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, रविवारी दुपारी चार वाजता रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी जाऊन चर्चेद्वारे हा प्रश्न मार्गी लावला आहे आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा शब्द दिला आहे.