सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात आज मुरूड–राजपुरी येथील कोकण क्रांती रिक्षा चालक-मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. संघटनेचा पक्षप्रवेश होताच उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पक्ष संघटनेला नवीन उर्जा मिळाल्याचे सांगितले.