आज गुरुवार दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास दत्त जयंतीच्या पावन दिनाचे औचित्य साधून तळा तालुक्यातील मौजे बोरघर येथे श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच साकव पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन व अंतर्गत रस्त्याचे उद्घाटनही आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी, तरुण मित्र मैत्रिणी, तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.